Get it on Google Play
Download on the App Store

रावणाची वैशिष्ट्ये

रावण जेवढा दुष्ट होता, त्याच्यामध्ये चांगले गुणही तेवढेच होते. कदाचित त्यामुळेच इतकी वाईट कृत्ये करूनही रावणाला महाविद्वान आणि प्रकांड पंडित मानले जाते. रावणाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या नेहमीच्या कथांमध्ये पाहायला मिळत नाहीत. विविध ग्रंथांमध्ये रावणाशी निगडीत अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. तरीही रावणाशी निगडीत काही अशा गोष्टी आहेत, ज्या अनेकांना अजूनही माहिती नाहीत. आता आपण माहिती करून घेऊयात रावणाच्या जीवनातील अशाच काही गोष्टींची




संगीत आणि विद्वान -
रावण संगीतातला खूप मोठा जाणकार होता. देवी सरस्वतीच्या हातात जी वीणा आहे, तिचा अविष्कार देखील रावणानेच केलेला आहे. रावण ज्योतिषी तर होताच, त्याचबरोबर तंत्र, मंत्र आणि आयुर्वेद यांच्यातील विशेषज्ञ देखील होता.

वीर योद्धा होता रावण -
रावण जेव्हा कधी युद्ध करण्यासाठी निघत असे, त्यावेळी तो स्वतः खूप आघाडीवर चालत असे आणि बाकी सैन्य मागे चालत असे. अनेक युद्ध तर त्याने एकट्यानेच जिंकली आहेत. रावणाने यमपूरीत जाऊन यमराजाला देखील युद्धात हरवले होते आणि नरकात शिक्षा भोगत असलेल्या जीवात्म्यांना मुक्त करून आपल्या सेनेत सामील करून घेतले होते. अर्थात एवढा वीर योद्धा असूनही रावण अनेकांकडून युद्धात हरला देखील होता.

असे होते रावणाचे वैभव -
राम चरित मानस मध्ये गोस्वामी तुळशीदास असे लिहितात की रावणाच्या दरबारात सर्व देवता आणि दिग्पाल हात जोडून उभे राहायचे. रावणाच्या महालाबाहेर जी अशोक वाटिका होती, तीमध्ये अशोकाचे १ लाखाहूनही अधिक वृक्ष होते. या वाटिकेमध्ये रावणाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य पुरुषाला जायला परवानगी नव्हती.

रथाला जुंपलेली असत गाढवे -
वाल्मिकी रामायणानुसार सर्व योद्ध्यांच्या रथाना उत्तम प्रतीचे घोडे जुंपलेले असत, परंतु रावणाच्या रथाला मात्र गाढवे जुंपलेली असायची. ती अतिशय वेगाने धावत असत.

समुद्राचे पाणी गोड हवे -
रावण सातही समुद्रांच्या पाण्याला गोड बनवू इच्छित होता.