रावणातील दुर्गुण / त्रुटी
अश्विन महिन्यात शुक्ल पक्षातील दशमी तिथीला विजया दशमी चा उत्सव साजरा केला जातो. अधर्मावर धर्माच्या विजयासाठी हा उत्सव साजरा करण्यात येतो. धर्म ग्रंथांनुसार या तिथीला प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. आता आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत, ज्या रावण देवांची सत्ता नष्ट करण्यासाठी करू इच्छित होता, परंतु त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही, कारण या सर्व गोष्टी निसर्गाच्या, प्रकृतीच्या नियमांच्या विरुद्ध होत्या. त्यांच्यामुळे अधर्म बळावला असता आणि राक्षसी प्रवृत्ती अनियंत्रित झाली असती.