Android app on Google Play

 

भगवान शंकराकडून रावणाचा पराभव

 रावण अतिशय शक्तिशाली होता, आणि त्याला आपल्या बळावर अतिशय घमेंड होती. गर्व होता. या घामेंडीच्या नशेतच एकदा रावण भगवान शंकराला हरवण्याच्या उद्देशाने कैलास पर्वतावर गेला होता. रावणाने शंकराला युद्धासाठी आव्हान दिले, परंतु भगवान शंकर त्यावेळी ध्यानस्थ होते. रावण कैलास पर्वत उचलू लागला. तेव्हा शंकराने पायाचा अंगठा दाबून कैलास पर्वत जड केला, हा भार रावण उचलू शकला नाही आणि त्यचा हात पर्वताच्या खाली अडकून दाबला गेला. खूप प्रयत्न करून देखील रावणाला तिथला आपला हात सोडवता येईना. तेव्हा रावणाने शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याच वेळी शिवतांडव स्तोत्र रचले. भगवान शंकर त्या स्तोत्राने प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला मुक्त केले. मुक्त झाल्यानंतर रावणाने भगवान शंकरांना आपले गुरु मानले.