ब्रम्हदेव
ब्रम्हदेवाची ५ शिरे होती, परंतु त्यांचे पाचवे मस्तक शंकराने कपले होते.
एकदा विष्णूने ब्रम्हदेवाला विचारले की ब्रम्हांडाचा निर्माता कोण आहे? गर्वाने, घमेंडीने ब्रम्हदेवाने विष्णूला सांगितले की तू माझी पूजा कर. एक दिवस ब्रम्हदेवाने विचार केला की मला ५ मस्तके आहेत, शंकरालाही ५ मस्तके आहेत, त्यामुळे मीच शंकर आहे. ब्रम्हदेवाने शंकराच्या कामांमध्ये ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा शंकराने क्रोधीत होऊन आपल्या बोटातून एक नख ब्राम्हदेवावर फेकले. त्या नखाने कालभैरवाचे रूप घेतले आणि ब्रम्हदेवाचे शीर छाटले. ब्रम्हदेवाचे शीर आजही काळभैरवाच्या हातात आहे. कालभैरवाच्या रुपात भगवान शंकर प्रत्येक शक्तीपीठाचे रक्षण करतात.