Android app on Google Play

 

हिंदू धर्म

 हिंदू धर्म हा जगातील सर्वांत प्राचीन धर्म आहे. हा धर्म ७००० वर्षे जुना आहे. या धर्मातील मूल्यवान ग्रंथ - ऋग्वेद ३८०० वर्षांपूर्वी लिहिला गेला. आश्चर्याची बाब अशी की जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिर हे भारतातील नाहीये. ते आहे कंबोडिया चे अंगकोर वाट, ज्याचे क्षेत्रफळ ८ लाख २० हजार चौरस मीटर इतके आहे! आयुर्वेदाची मुळे ही हिंदू धर्मातच रुजलेली आहेत. आज जगभरात १ अब्ज पेक्षा अधिक लोक हिंदू धर्माचे पालन करतात. ही संख्या जगाच्या लोकसंख्येच्या १४% इतकी आहे. हिंदुत्व हे या धर्माचे खरे नाव आहे. अर्थात या धर्माला हे नाव सिंधू नदीच्या जवळ राहणाऱ्या ग्रीक आणि अरबी लोकांनी दिले आहे. वास्तवात हिंदू धर्माचे खरे नाव सनातन धर्म आहे. ज्याचा अर्थ आहे अनंत धर्म. ज्याचा कधीही शेवट होणार नाही. धर्मातील वेद तब्बल ५००० वर्षांपर्यंत नुसते पाठ करून, लक्षात ठेऊन, न छापता सुरक्षित ठेवले होते.