बेडकांच लग्न
आपल्या देशात मे आणि जून हे सर्वात उष्ण महिने आहेत. या महिन्यात तापमान ४० ते ४५ अंशापर्यंत राहत. जून महिन्यात लोकांना पाऊस पडण्याची आशा असते. पण बऱ्याच वेळा पाऊस उशिरा पर्यंत येतच नाही अश्यावेळी बेडकांच लग्न लावून देवाला प्रसन्न केलं जात. अशी मान्यता आहे की बेडकांच लग्न लावल्याने देव लोकांना पाऊस पडण्याचा आशीर्वाद देतील. बेडकांच्या लग्नाची अशी मान्यता आहे की पाऊस पडल्यावर बेडूक बाहेर येऊन इंद्रदेवांचे स्वागत करतील. हे लग्न यासाठी लावल जात की बेडकांच्या ओरडण्याच्या आवाजाने इंद्रदेव पृथ्वीवर येतील आणि त्याच्या सोबत पाऊसही घेऊन येतील. बेडकांच ओरडण हे पाऊस येण्याचे संकेत आहेत.