Android app on Google Play

 

धिंगा गावर

 धिंगा गावर हा सण पश्चिम राजस्थान मधील जोधपुर मध्ये साजरा केला जाणारा सण आहे. धिंगा गावर ही स्थनिक देवी आहे. भगवान शिवांच्या पत्नीचे गणगौर हे रूप तिथे पहायला मिळते. हा उत्सव होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. अस म्हटल जात की भगवान शिवांनी पार्वतीला मोची बनून सतावल होत आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून देवी पार्वती भिल्लांच्या स्वरुपात तयार होऊन त्याच्या समोर आल्या होत्या. धिंगा गावर हा सण पूर्व सूर्यास्तानंतर सुरु होतो, जेव्हा त्यांच्या प्रतिमा जोधपुर शहरांमधील ११ स्थानांवर ठेवल्या जातात. प्रत्येक प्रतिमेला राजस्थानी वेशभूषेत सर्व आभूषणांनी तयार केलं जात. महिला देवी-देवता, पोलीस, संत, डाकू किंवा आदिवासिंच्या वेशात तयार होतात आणि त्यांच्या हातात एक वेताची काठी असते. रात्रभर जोधपुरच्या रस्त्यावर फिरून त्या प्रतीमेंचे रक्षण करतात. अशी मान्यता आहे की अश्यावेळी कुणी अविवाहित पुरुष त्या महिलांच्या जवळ आला आणि त्या महिलांनी त्याला वेताच्या काठीने मारल तर त्याचं लग्न एखाद्या चांगल्या मुलीशी होत.  हा एक सण असा आहे की जिथे महिलांना प्राथमिकता मिळते. या सणानमध्ये विधवाही सहभागी होऊ शकतात. ज्या महिला या सणात सहभागी होतात त्या संपूर्ण रात्र वेताची काठी घेऊन रस्त्यावर राज्य करतात.