अघोरी साधूंच मास भक्षण
अघोरी एक अशा हिंदू सांप्रदायाचा भाग आहे जे भगवान शिव यांची पूजा करतात. यांची अशी मान्यता आहे की शिव ह्या सर्व गोष्टींचे सांभाळकर्ता आहेत त्यामुळे ते कुठल्याच गोष्टीला वाईट मानत नाहीत. म्हणून ते बऱ्याचदा यौन परंपरा, मदिरा प्राशन, मांस भक्षण करणं यांन सारख्या गोष्टी करत असतात. पण जी एक प्रथा विचित्र आहे ती म्हणजे माणसांचे मास खाण. एक अघोरी साधु स्मशाणात रहातो आणि त्याचा उदरनिर्वाहही तिथूनच होतो. त्याचे कपडेही मेलेल्या माणसांकडूनच येतात. लाकड तो चीतेवरून घेतो आणि जेवण नदीतून मिळवतो. अघोरींच्या आयुष्यातील भयानक गोष्ट म्हणजे ते मानवांचे मासं खाण्याची प्रथा आहे. नदीतून मिळणाऱ्या मृत शरीरांना एकत्र करून समाधी तयार केली जाते नंतर त्या शरीराचे हात पाय काढून कच्चे खाल्ले जातात.