मुलांना मानेपर्यंत जमिनीत गाडणे
उत्तर कर्नाटकात या प्रथेत मुलांना मानेपर्यंत गाडल जात कारण त्यांची शारीरिक विकलांगता बरी होऊ शकेल. या प्रथेला सूर्यग्रहणाच्यावेळी आमलात आणल जात. सूर्योदयाच्या आधी मोठे खड्डे खणले जातात. मुलांना १ ते ६ तास या खड्ड्यांमध्ये ठेवलं जात. काही आई वडिलांची अशी मान्यता आहे कि विकलांगता ही सूर्यग्रहणाच्या नकारात्मक प्रभावमुळे होते. त्यामुळे त्यांना बर करण्यासाठी गरजेच आहे की त्या मुलांवर सूर्याची किरण पडावीत आणि जमिनीत यासाठी ठेवल जात कारण आपण आपल्या धरतीला पवित्र मानतो. काही आई वडिलांची अशी मान्यता आहे कि असं केल्याने त्यांची मुले बरी झाली आहेत.