Android app on Google Play

 

सिंधुताई सपकाळ

 


या मराठमोळ्या बाईला अनाथांची माता म्हटलं जातं. त्या १० वर्षांच्या असताना त्यांचे ३० वर्षे वयाच्या एका गुराख्याशी लग्न लावून देण्यात आले आणि केवळ २० वर्षांच्या होईपर्यंत त्यांना ३ मुले झाली होती. त्यांनी आपल्या गावाच्या सरपंचाविरुद्ध आवाज उठवला कारण गावकऱ्याना मोबदला न देता तो शेणाच्या गोवऱ्या विकून टाकत असे. या गोष्टीवरून चिडून त्याने सिंधुताईंच्या पतीला तिला सोडून देण्यास सांगितले, आणि त्या वेळी त्यांच्या पोटात ९ महिन्यांचे मूल होते. १४ ऑक्टोबर १९७३ ला त्यांनी एका गुरांच्या गोठ्यात एका मुलीला जन्म दिला. घरातून हाकलून दिल्यानंतर त्यांनी रेल्वे फलाटांवर अन्नासाठी भिक मागायला सुरुवात केली. या काळात त्यांना जाणीव झाली की  कित्येक अशी मुलं आहेत ज्यांना आई-बापाने सोडून दिलं आहे. आणि त्यांनी अशा मुलांना जवळ करून त्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी निश्चय केला की जे कोणी अनाथ असतील, त्यांची आई व्हायचं. त्यांनी स्वतःच्या पोटच्या मुलीला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टला दत्तक देऊन टाकलं, जेणेकरून कोणी असं म्हणू नये की  त्या आपल्या सख्ख्या आणि अनाथ मुलांमध्ये भेदभाव करतात.

आपल्याला अशा स्त्रियांचा अभिमान वाटला पाहिजे.