Android app on Google Play

 

कॅप्टन लक्ष्मी सहगल

 १९३० साली मद्रास मेडिकल कॉलेज इथून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी समाजकार्य सुरू केले. १९४० च्या दशकामध्ये त्यांनी झाशीची राणी पलटणीचे नेतृत्व केले. १९५० पासून २००० पर्यंत त्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया च्या सक्रीय नेत्या राहिल्या. १९८० च्या दशकात त्यांनी भोपाल वायू दुर्घटना आणि शीख दंगलींमध्ये डॉक्टरांची भूमिका निभावली. वयाच्या ९२व्या वर्षापर्यंत त्या लोकांचा मोफत इलाज करत राहिल्या. २०१२ साली वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि जाता जाता त्या आपले शरीर देखील वैद्यकीय अभ्यासासाठी दान करून गेल्या.