Get it on Google Play
Download on the App Store

रंगू सौरीया


या जगात असे खूप कमी, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक असतील जे दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. बंगालच्या उत्तर भागातील दार्जीलिंग हिल्स मधल्या रंगू सुरिया हिने जवळ जवळ ८००० मुलींना नेपालळ सीमेवर "यौन गुलामी" आणि शोषणापासून वाचवले आहे. याशिवाय जवळ जवळ २०,००० लहान मुले आणि मुली ज्यांना सिक्कीम, उत्तर बंगाल आणि आसाम इथे विकण्यासाठी आणण्यात आलं होतं त्याना वाचवलं.
या सगळ्याची सुरुवात झाली २००४ मध्ये, जेव्हा रंगू आणि तिच्या मित्रांनी एका १३ वर्षांच्या मुलीला एका व्यावसायिकाच्या तावडीतून वाचवलं. त्या मुलीला तिथे गुलामाप्रमाणे वागणूक दिली जात होती. या घटनेपासून तिने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवले आणि तेव्हापासून तिने आपले संपूर्ण आयुष्य अशा मुलींचा बचाव करण्यासाठी वाहून घेतले.