Android app on Google Play

 

अनंतपूर चा लटकता खांब

 


अनंतपूर येथील ला लेपाक्षी मंदिर जवळ जवळ ७० मजबूत खांबांवर उभं आहे, ज्यांनी वर्षानु वर्ष त्याचं वजन पेललं आहे. पण त्यामध्ये एक असा खांब आहे ज्याला लटकता खांब असंही म्हटलं जातं, कारण तो जमिनीला स्पर्श करत नाही, तर जमिनीपासून काही इंच अंतरावर राहतो. या खांबाच्या खालून एखादा पातळ कागद किंवा लाकडाची पट्टी आरपार जाऊ शकते ज्यामुळे तो खांब जमिनीला स्पर्श करत नाही हे सिद्ध होतं.