क्षण
लेखिका - तेजस्विता किरण सोनगिरे
क्षणात यावे क्षणात जावे क्षणिक हे जीवन सुंदर व्हावे।।धृ।।
क्षणात व्यक्ती आपुल्या होती
क्षणात आपल्याला सोडून जाती
मग क्षणिक हे हसने
क्षणिक हे रडणे
क्षण क्षण ह रुसुंन बसने।।2।।
तारे नेहामि क्षणात तूटती
डोळे आपले क्षणात मिटती
मग त्या क्षणांचीच होते माती।।3।।
म्हनुनच ...
क्षणात यावे क्षणात जावे
क्षणिक हे जीवन सुंदर व्हावे.