नमू प्रारंभी गणेश
लेखक - सुरेश पुरोहित
चला चला गणेशाची आरती करू
सदा आरंभी यास नमू
चला चला गणेशाची आरती करू
शिवपार्वतीचा हा सूनु
यासी सदाची आम्ही भजू
चला चला गणेशाची आरती करू
एक ऐसा असे देव
करी जनांची जमवाजमव
सारे एकजुटीने राहू
चला चला गणेशाची आरती करू
हा तो असे विघ्नहर्ता
हरितालिका याची माता
पिता ध्यानमग्न शंभू
चला चला गणेशाची आरती करू
वक्रतुंड महाकाय
शुंडा, कर्णे, गजानन भाव
वाहनाने चकित होऊ
चला चला गणेशाची आरती करू
चला जनहो आरतीला
चला भजूया गजाननाला
त्याचे छान आशिष घेऊ
चला चला गणेशाची आरती करू
चला चला गणेशाची आरती करू
चला चला गणेशाची आरती करू