दिवाळी
लेखक - सुरेश पुरोहित
कानी कुंडल मोतीहार घेऊनी दिवाळी आली
पाहतां पाहतां मला सृष्टी सजलेली दिसली
सजलेली लेक माझी सजलेली वामांगीही
तेजोमय स्फ़ुल्लींगांतुनी पृथ्वी हंसतांना दिसली
आनंद कल्लोळ माझ्या आसमंती भरलेले
दीप तोरणांनी सारे नगर हे सजलेले
ओतप्रोत आनंद तो चमकत नभी शिरला
ऊधाण आनंदा आले मावेना दशदिशांना
आनंद मनी माईना तैसा तो ईतरां भेटो
ऊंच नीच थोर लहान सणात या हर्ष पावो
देऊनिया दान अपुले धरीत्री भरूनी पावे
शेतक-यांच्या दारी ही हंसोत हे हर्ष दिवे