दंगल
लेखक - प्रशांत वंजारे (९४२०६८९२४२)
शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव
झालेली आहे
सर्व विषारी भाषणांची
उजळणी झालेली आहे
मशीदीवर फेकण्याचा
रंग
बोर्डाला लावायचे डांबर
पुतळ्याच्या गळ्यात
घालण्यासाठी चप्पल
असी सर्व तयारी
केलेली आहे
थोडक्यात,
धूळ पेरणी झालेली आहे
फक्त निवडणुकीच्या
पावसाची प्रतीक्षा आहे
सर्वांनी सतर्क राहावं
दंगल कधीही भडकू शकते.