Get it on Google Play
Download on the App Store

ईश्वराने लिहीलेलं... आपलं आयुष्यं...!

लेखिका - गौरी अभिषेक ठमके

एक छान गोष्टं वाचनात आली एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते. पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते. तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो. एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो. सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते. तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो. वाघ जोरात झेप घेतो. आणि  तितक्यात वीज चमकते. त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं. आणि ती गोळी त्या वाघाला लागते. वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो. त्यामुळे वणवाही विझतो. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते.

माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं... आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची... कर्ता करविता असतो तो ईश्वर... एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही... मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच... आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच... 'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला' पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'... त्याला अलगदपणे त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.' तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल?? कुणीच नाही ना... हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं... ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!


बापहो हिन्दू, मुसलमान एकच आहे. तुमच्या रक्ताचा रंग कसा ?

लोक - 'लाल '.

गाडगेबाबा - देहत्याग केल्यावर या शरीराचे काय होते?

लोक - 'माती'...

गाडगेबाबा - बापहो जे हिन्दूंच्या शरीराचे होते तेच

मुसलमानांच्या शरीराचे होते,

मग हिन्दू आणि मुसलमान यात भेदाभेद कशाला?

- राष्ट्रसंत संत गाडगेबाबा.

अर्थ मराठी दिवाळी अंक २०१५

अभिषेक ठमके
Chapters
संपादकीय प्रस्तावना अमेरिकेतील एक डेटिंग सेंटर (डेटींग - मनाची उकल संकल्पना) कुटुंबाचा आधारवड जगा आणि जगू द्या! ईश्वराने लिहीलेलं... आपलं आयुष्यं...! दोन बालकांची पत्रे ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय – एक मनःपटलावरील युद्ध अश्रुधार शिक्षणाचा बोजा (नाना पाटेकर) जे तुला शिकता आले नाही… अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम... श्रद्धा सर्वांनी लक्षात ठेवावे असे... सामन्याने पाहिलेले असामान्य स्वप्न नाते समृद्ध होण्यासाठी... जमिनीवर बसून जेवणाचे फायदे स्वर्ग आणि नरक आहाराविषयी ‘ओम’ नाम चांगली विचारधारा Marathi Status दिवाळी नमू प्रारंभी गणेश दंगल साम्राज्य...! गूढ मनाच्या खेळी खेळ...! शिवबाची कृपा छत्रपती शिवाजी धरणीमाता क्षण मी व राजकारणी भरत उपासनींच्या चारोळ्या तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल आळस