गूढ मनाच्या खेळी
लेखक - भरत उपासनी
मी कळतच नकळत केव्हा
वाटेने चालत जातो
गूढ सुंदर तिथल्या प्रतिमा
मी धुक्यात निरखीत जातो //१//
कुणी गूढ अशी ही शक्ती
मज धुक्यात खेचून नेते
जणू अवघड कोडे मजला
हळू उकलत उकलत जाते //२//
ही संमोहाची यात्रा
अन गूढ मनाच्या खेळी
पक्ष्यांचे थवे उतरती
जणू कवितांच्या ह्या ओळी //३//