चांगली विचारधारा
लेखिका - योगिता जाधव
- जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही.
- दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.
- सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही.
- समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.
- मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.
- आपली माणस कोण ते संकटांशिवाय कळत नाही .
- सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.
- उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही.
- जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही.
- काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.
- मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही.
- चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.