गाढव आणि बेडूक
एकदा एक गाढव पाठीवर लादलेल्या ओझ्याने खचून जाऊन एका डबक्यात पडले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले. ते ऐकून तिथेच असलेला एक बेडूक त्याला म्हणाला, 'अरे तू आत्ता थोडा वेळ या डबक्यात पडला आहेस तर इतका ओरडतोस, मग आमच्याप्रमाणे जर जन्मभर इथेच राहण्याचा प्रसंग आला तर तू काय करशील ?'
तात्पर्य
- एखाद्याला जी गोष्ट सवयीमुळे साधी वाटते तीच गोष्ट दुसर्याला कठीण वाटते.