कोंबडा आणि रत्न
एकदा एका कोंबड्याला उकीरडा उकरीत असताना एक रत्न सापडले. ते खूप चकाकत होते म्हणून त्याला ते रत्न आहे असे समजले. परंतु त्याचा उपयोग कसा करावा ते त्याला समजेना, म्हणून तोंड वाकडे करून तो म्हणाला, 'अरे रत्ना, तू फार सुंदर आहेस. पण मला जगातल्या सगळ्या रत्नांची किंमत जोंधळ्याच्या एका दाण्याइतकी पण वाटत नाही.'
तात्पर्य
- कोणतीही वस्तू आपल्या उपयोगाची नाही म्हणून तिची थट्टा करणे हा मूर्खपणा होय.