गिधाड आणि त्याचे पाहुणे
एका गिधाडाने आपल्या वाढदिवसाला सगळ्या पक्ष्यांना मेजवानीचे आमंत्रण केले. सगळे पक्षी ठरलेल्या वेळी हजर झाले. नंतर गिधाडाने घराचे दार लावून घेतले आणि त्यांना मेजवानी देण्याऐवजी त्या सगळ्यांणा मारून खाल्ले.
तात्पर्य
- जो सदा भुकेला असतो अशा माणसाने जेवावयास बोलावले तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवणे मूर्खपणाचे ठरते.