खेकडा आणि त्याचे पोर
एकदा एक खेकडा आपल्या मुलाला म्हणाला, 'मुला, तू असा वाकडा वाकडा का चालतोस? इतर प्राण्यांप्रमाणे सरळ का चालत नाहीस?'
तेव्हा मुलाने उत्तर दिले, 'बाबा मी तर तुमच्यासारखाच चालतो. परंतु, सरळ कसं चालावं हे जर तुम्ही मला दाखवलंत तर मीही तसाच चालीन.'
तात्पर्य
- जी गोष्ट स्वतःला येत नाही, ती दुसर्याला येत नाही म्हणून नावे ठेवणे हा मूर्खपणा होय.