गरुड आणि घुबड
सर्व पक्ष्यांत सुंदर मुले कोणाची हे बघण्यासाठी गरुडराजाने सर्व पक्ष्यांना पिल्ले घेऊन दरबारात बोलाविले. त्याप्रमाणे सर्व पक्षी हजर झाले व प्रत्येकाने आपल्या पिल्लांचे कौतुक करण्यास सुरुवात केली. शेवटी घुबड पुढे आले व म्हणाले, 'सौंदर्यावरून निवड करायची असेल तर माझी मुलंच सर्वात सुंदर आहेत.'
हे ऐकून सर्वजण हसू लागले व त्यांनी घुबडाला तेथून हाकलून लावले.