डोमकावळा
एकदा एका डोमकावळ्याने मोराची पिसे आपल्या पंखात खोचली आणि तो मोरांच्या कळपात शिरला. परंतु त्याला ओळखून मोरांनी त्याला टोचून टोचून अर्धमेला केले. त्याने लावलेली मोराची पिसे त्यांनी काढून घेतली. तेव्हा तो खिन्न होऊन परत आपल्या मंडळीत गेला तेव्हा त्यांनी त्याच्या ढोंगीपणाची त्याची छीः थू केली.
तात्पर्य
- आपल्याला ज्या स्थितीत देवाने जन्माला घातले आहे त्यात समाधानी असावे.