स्वस्थिति
विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवेंभावें ॥१॥
पंचप्राणज्योति ओंवाळुनी आरती । ओवाळिला पती रखुमाईचा ॥२॥
शड्रस पक्कवान्नें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥