स्वस्थिति
इतकेंचि देईं रामनाम मुखीं । संताची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरीं सुख मज ॥२॥
उच्छिष्ट धणिवरी पोटभरी धाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळू देवा ॥४॥