स्वस्थिति
अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकाची काय सांगों ॥१॥
पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिकां जेथें न कळेचि अंत । तेथे मी पतित काय वानूं ॥३॥
चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार । कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥