Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक १६६ ते १७०

सहस्रपत्रनिलय: सहस्रफणभूषण: ।
सहस्रशीर्षापुरुष: सहस्राक्ष: सह्स्रपात्‌ ॥१६६॥
९७९) सहस्रपत्रनिलय---ब्रह्मरन्ध्रगत सहस्रारचक्रात (सहस्रदल कमळात) राहणारा.
९८०) सहस्रफणभूषण---सहस्र फणाधारी नागांनी विभूषित.
९८१) सहस्रशीर्षापुरुष---विराट पुरुष. हजारो (असंख्य) मस्तके धारण करणारा. परमात्मा.
९८२) सहस्राक्ष---सहस्र नेत्र असलेला. असंख्य नेत्र असणारा.
९८३) सहस्रपात्‌---सहस्र पाय असलेला.
सहस्रनामसंस्तुत्य: सहस्राक्ष-बल-अपह:।
दशसाहस्र-फण-भृत-फणिराज-कृतासन: ॥१६७॥
९८४) सहस्रनामसंस्तुत्य---सहस्र नामांनी ज्याची स्तुती करावी असा.
९८५) सहस्राक्षबलापह---(सहस्राक्ष = इन्द्र) इंद्रसैन्याचा किंवा इंद्रबलाचा फडशा पाडणारा. विध्वंस करणारा.
९८६) दशसाहस्रफणभृत्‌फणिराजकृतासन---दहा हजार फणा धारण करणार्‍या नागराज वासुकीचे ज्याने आसन केलेले आहे असा.
अष्टाशीतिसहस्र-आद्यमहर्षि-स्तोत्र-यन्तित:।
लक्षाधीश-प्रियाधार: लक्ष्याधारमनोमय: ॥१६८॥
९८७) अष्टाशीतिसहस्राद्यमहर्षिस्तोत्रयन्त्रित---अठ्ठयाऐंशी हजार आद्यमहर्षीनी स्तवन केल्यावर वशीभूत झालेला. किंवा अठ्ठयाऐंशी हजार आद्यमहर्षिरचित स्तोत्रांनी वश होणारा.
९८८) लक्षाधीशप्रियाधार---धनवंतांचे आवडते अधिष्ठान असलेला किंवा सर्वश्रेष्ठ धनवान्‌ असा जो कुबेर त्याचा आधार असलेला.
९८९) लक्ष्याधारमनोमय---लक्ष्यावर एकाग्र चित्त करणारा. लक्ष्यावर चित्त एकाग्र करण्यास आधार असणारा.
चतुर्लक्ष-जपप्रीत: चतुर्लक्ष-प्रकाशित: ।
चतुर्‌-अशीति-लक्षाणां जीवानां देह्संस्थित: ॥१६९॥
९९०) चतुर्लक्षजपप्रीत---चार लक्ष मन्त्रजपाने प्रसन्न होणारा.
९९१) चतुर्लक्षप्रकाशित--- चार लक्ष श्लोकसंख्या असणार्‍या १८ पुराणांनी ज्याचे वर्णन केले्ले आहे असा. चार लक्ष मन्त्रजपाने प्रकट होणारा.
९९२) चतुरशीतिलक्षाणां जीवानां देहसंस्थित---चौर्‍याऐंशी लक्षयोनी जीवांच्या देहांमध्ये विराजमान असणारा.
कोटिसूर्यप्रतीकाश: कोटिचन्द्रांशुनिर्मल: ।
शिवोद्‌भव-अध्युष्टकोटि-अष्टकोटि-विनायक-धुरन्धर ॥१७०॥
९९३) कोटिसूर्यप्रतीकाश---(प्रतीकाश=सारखा, सदृश) कोटीसूर्याप्रमाणे तेजस्वी.
९९४) कोटिचन्द्रांशुनिर्मल---कोटी चन्द्रकिरणांप्रमाणे निर्मल.
९९५) शिवोद‌भवाध्युष्टकोटिविनायकधुरन्धर---शंकर आणि पार्वती यांनी अधिष्ठित अशा कोटयावधी विनायकांचा धुरंधर नेता.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५