Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक १०१ ते १०५

प्रमाण-प्रत्यय-अतीत:, प्रणत-आर्ति-निवारण: ।
फलहस्त: फणिपति: फेत्कार: फाणितप्रिय: ॥१०१॥
५५१) प्रमाणप्रत्ययातीत---प्रमाण व प्रतीती याहून भिन्न. नित्यज्ञानरूप.
५५२) प्रणतार्तिनिवारण---शरणागत भक्तांचे दुःख (आर्ति) निवारण करणारा.
५५३) फलहस्त---स्वभक्तांना तत्काळ फलदायी होणारा. हातात फळ असणारा.
५५४) फणिपति---फणि म्हणजे महाशेष. महाशेषाचा स्वामी.
५५५) फेत्कार---फेत्कार तन्त्रस्वरूप.
५५६) फाणितप्रिय---फाणित म्हणजे गोरस (दूध, तूप इ.) आणि दुसरा अर्थ काकवी ज्याला प्रिय आहे असा. किंवा गूल ज्याला आवडतो तो.
बाण-अर्चित-अङघ्रि-युगुल:, बालकेलि-कुतूहली ।
ब्रह्म, ब्रह्म-अर्चित-पद:, ब्रह्मचारी, बृहस्पति: ॥१०२॥
५५७) बाणार्चिताङघ्रियुगुल---बाणासुरानेही ज्याच्या चरणकमळांची पूजा केली आहे असा.
५५८) बालकेलिकुतूहली---बालक्रीडा कौतुकाने करणारा.
५५९) ब्रह्म---परब्रह्मस्वरूप.
५६०) ब्रह्मार्चितपद---वेद ज्याचे पद पूज्य मानतात असा. किंवा ब्रह्मदेवाने ज्याच्या चरणांची पूजा केली आहे असा.
५६१) ब्रह्मचारी---ब्रह्मचर्यनिष्ठा. (ज्याने विवाह केलेला नाही = खद्योतभाष्य), वेदांचा अभ्यास करणारा.
५६२) बृहस्पति---देवगुरू बृहस्पतिरूप. वाचस्पतिस्वरूप.
बृहत्तम: ब्रह्मपर: ब्रह्मण्य: ब्रह्मवित्‌-प्रिय: ।
बृहन्‌-नाद-अग्य्र-चीत्कार:, ब्रह्माण्ड-आवलि-मेखल: ॥१०३॥
५६३) बृहत्तम---श्रेष्ठातही श्रेष्ठ असा सर्वश्रेष्ठ. विशालाहून विशाल. त्रिमूर्तीहूनही श्रेष्ठ.
५६४) ब्रह्मपर---वेदांचेच अनुशीलन करण्यात तत्पर किंवा ब्रह्मदेवाहूनही श्रेष्ठ.
५६५) ब्रह्मण्य---ब्राह्मणांचा हितकारी किंवा त्यांना मान देणारा.
५६६) ब्रह्मवित्प्रिय---ब्रह्मवेत्त्यांना प्रिय असणारा किंवा त्यांना प्रिय मानणारा.
५६७) बृहन्नादाग्य्रचीत्कार---मेघांचा गडगडाट किंवा वीजेच्या कडकडटाहूनही अधिक उच्च स्वरात गर्जना करणारा. चीत्कार - गजशब्द.
५६८) ब्रह्माण्डावलिमेखल---समस्त ब्रह्माण्डे कटिसूत्र म्हणून बांधणारा. ब्रह्माण्डांची मेखला धारण करणारा.
भ्रूक्षेपदत्तलक्ष्मीक: भर्ग: भद्र: भयापह: ।
भगवान्‌ भक्तिसुलभ: भूतिद: भूतिभूषण: ॥१०४॥
५६९) भ्रूक्षेपदत्तलक्ष्मीक---भुवईच्या संकेतमात्रे भक्तांना लक्ष्मी देणारा.
५७०) भर्ग---तेजस्वरूप.
५७१) भद्र---कल्याणकारी, शुभ, मंगल. किंवा भद्र, मन्द्र. मृग या हत्तींच्या श्रेष्ठ जाती असून भद्र ही त्यातील सर्वश्रेष्ठ जात. त्याचे मुख असणारा.
५७२) भयापह---भय नाहीसे करणारा.
५७३) भगवान्‌---समग्र ऐश्वर्य, धर्म. यश, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्य या सहा गोष्टींना ‘भग’ असे म्हणतात. भग म्हणजे भाग्य, कल्याण, वरील सहा गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला ‘भगवान्‌’ अशी संज्ञा दिली जाते. भगवान. विद्या व अविद्यांचा जाणकार.
५७४) भक्तिसुलभ---भक्तीने सहज प्राप्त होणारा.
५७५) भूतिद---भूति म्हणजे समृद्ध, ऐश्वर्य, वैभव देणारा.
५७६) भूतिभूषण---वैभवसंपन्न. भूति म्हणजे भस्म. भस्मचर्चित असा.
भव्य: भूतालय: भोगदाता भ्रूमध्य-गोचर: ।
मन्त्र: मन्त्रपति: मन्त्री मदमत्तमनोरम: ॥१०५॥
५७७) भव्य---ब्रह्याच्या संकल्पने सृष्टी निर्माण होते. त्या संकल्पक्षमतेस ‘भावुकता’ म्हणतात. त्या रूपाचा आधिष्ठानरूपाने विश्वात प्रवेश आहे म्हणजे त्याला ‘भावि’ विश्वात्मकत्व आहे. या प्रकारचे भावुकरूपत्व आणि भाविविश्वात्मकत्व असणारा तो भव्य. किंवा अतिविशाल किंवा कल्याणकारी.
५७८) भूतालय---पञ्चमहाभूते, भूत-प्रेत आदी समस्त भूतसृष्टीचे अधिष्ठान अथवा वसतिस्थान.
५७९) भोगदाता---प्राणिमात्रांस कर्मानुसार दु:ख किंवा सुख देणारा.
५८०) भ्रूमध्य-गोचर---ध्यानावस्थेत भ्रूमध्याच्या ठिकाणी योगिजनांच्या अनुभवास येणारा.
५८१) मन्त्र---ऋग्यजुस्साम मन्त्रस्वरूप. किंवा मन्त्र याचा एक अर्थ राज्यकारभार सुव्यवस्थित चालविण्यास उपयुक्त सल्ला असाही आहे. अशा अर्थीही मन्त्रस्वरूप असणारा.
५८२) मन्त्रपति---मन्त्रांचा स्वामी, मन्त्रणाचा अधिपती, पालक, प्रवर्तक.
५८३) मन्त्री---राज्यसंचालनास आवश्यक असलेल्या मन्त्रशक्तीचा अधिष्ठाता. विचारविनिमय करणारा.
५८४) मदमत्तमनोरम---आत्मानंदात डुलत असणारे मनोहर रूप असणारा.आत्मानन्दाच्या मदाने मत्त तरी मनोरम.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५