Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ५१ ते ५५

महालक्ष्मीप्रियतम: सिद्धलक्ष्मीमनोरम: ।
रमा-रमेश-पूर्वाङ्ग दक्षिण-उमा-महेश्वर: ॥५१॥
२८०) महालक्ष्मीप्रियतम---ही महालक्ष्मी म्हणजे श्रीगणेशाची बुद्धिरूपा पत्नी आहे. महालक्ष्मीस अत्यंत प्रिय असणारा.
२८१) सिद्धलक्ष्मीमनोरम---सिद्धलक्ष्मी ही श्रीगणेशाची दुसरी पत्नी. सिद्धलक्ष्मीला मनोरम वाटणारा.
२८२) रमारमेशपूर्वाङ्ग---रमा = लक्ष्मी. रमेश = विष्णू. हे ज्याच्या पूर्वद्वारावर, धर्मद्वारावर विराजित असतात.
२८३) दक्षिणोमामहेश्वर---उमा-महेश्वर ज्याच्या दक्षिणद्वारावर, अर्थमंडपावर विराजमान असतात.
मही-वराह-वामाङ्ग: रति-कंदर्प-पश्चिम: ।
आमोद-मोद-जनन: सप्रमोद-प्रमोदन: ॥५२॥
२८४) महीवराहवामाङ्ग---पृथ्वी आणि वराह ज्याच्या डाव्या अंगास म्हणजे उत्तरेस विराजमान असतात.
२८५) रतिकंदर्पपश्चिम---रती आणि कामदेव ज्याच्या पश्चिम दिशेस विराजमान असतात.
२८६) आमोदमोदजनन---आमोदप्रमोद इ. अष्ट गाणेशगणांचा जनक किंवा आनंदात अधिक आनंद निर्माण करणारा.
२८७) सप्रमोदप्रमोदन---आनंदी लोकांना अधिक आनंदी करणारा.
समेधित-समृद्धि-श्री: ऋद्धिसिद्धि-प्रवर्तक: ।
दत्त-सौमुख्य-सुमुख: कान्ति-कन्दलित-आश्रय: ॥५३॥
२८८) समेधितसमृद्धिश्री---समृद्धियुक्त लक्ष्मीला संवर्धित करणारा.
२८९) ऋद्धिसिद्धिप्रवर्तक---ऋद्धि व सिद्धि यांचा प्रवर्तक.
२९०) दत्तसौमुख्यसुमुख---सुमुखास सुमुखता प्रदान करणारा. समाधानी भक्तास समाधान प्रदान करणारा.
२९१) कान्तिकन्दलिताश्रय---कान्ती म्हणजे शरीरावरील तेज त्यास अंकुरित करणारा.
मदनावती-आश्रित-अङिघ्र: कृत्त-दौर्मुख्य-दुर्मुख: ।
विघ्न-सम्पल्लव-उपघ्न: सेवा-उन्निद्र-मदद्रव: ॥५४॥
२९२) मदनावत्यश्रिताङघ्रि---मदनावती नामक शक्ती ज्याचे पादसेवन करते.
२९३) कृत्तदौर्मुख्यदुर्मुख---दुर्मुखाच्या दुर्मुखतेस दूर करणारा.
२९४) विघ्नसम्पल्लवोपघ्न---विघ्नविस्ताराचा नायनाट करणारा म्हणजेच नवीन विघ्ने आधीच नष्ट करणारा.
२९५) सेवोन्निद्रमदद्रव---मदद्रवा नामक शक्ती आळस झटकून सदैव ज्याच्या सेवेत जागरूक असते अथवा भक्तांच्या सेवेने जागरण झाल्यामुळे जो मदद्रवयुक्त झाला आहे असा.
विघ्नकृत्‌-निघ्न-चरण: द्राविणीशक्तिसत्कृत: ।
तीव्राप्रसन्ननयन: ज्वालिनी-पालित-एकदृक्‌ ॥५५॥
२९६) विघ्नकृनिघ्नचरण---विघ्न निर्माण करणारा अभक्तसुद्धा ज्याचे चरण दृढ धरून ठेवतो असा.
२९७) द्राविणिशक्तिसत्कृत---द्राविणी नामक शक्तीकडून ज्याचा सम्मान केला जातो.
२९८) तीव्राप्रसन्ननयन---तीव्रा नामक शक्तीमुळे ज्याचे नेत्र प्रसन्न झाले आहेत.
२९९) ज्वालिनीपालितैकदृक्‌---ज्याची मुख्य दृष्टी ज्वालिनी नामक शक्तीकडून संरक्षित आहे.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५