Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ८१ ते ८५

ब्रह्मदेवाजवळील समग्र वेदांचे हरण केले होते. सर्वत्र वैदिक ज्ञानसता लोप पावली होती. कपिलांच्या दर्शनाबरोबर सर्वांच्या अंत:करणात वेद प्रकाशित झाले. सर्वत्र वेदविद्यादिकांची समृद्धी झाली. सर्व देवांनाही अवध्य असलेल्या कमलासुराचा नाशही कपिलांनीच केला.
कपिलावतारामध्ये श्रीगणराजप्रभूंचे त्रिगुणातीतत्वसूचक ऐश्वर्य तर स्पष्ट होतेच त्याचबरोबर वेदादिविद्याप्रकाशकत्व आणि विष्णूच्या कार्यसिद्धीचे मूलभूतव्य सत्तादायकत्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते.
४४७) कथळ---कानात उपदेश करणारा. (संप्रदायप्रवर्तक). वक्त्ता.
४४८) कटिसूत्रभृत्‌---कटिसूत्रधारक. रत्नखचित सुवर्णाचा कमरपट्टा धारण करणारा.
खर्व: खड्‌गप्रिय: खड्‌गखान्तान्त:स्थ: खनिर्मल: ।
खल्वाट-शृङ्ग-निलय: खट्‌वाङ्गी ख-दुरासद: ॥८५॥
४४९) खर्व---वामनरूप. (वामनरूपत्वात्‌ खड्‍ग: गण्डकसंज्ञक:)
४५०) खड्‌गप्रिय---खडग म्हणजे तलवार. ज्याला तलवार प्रिय आहे असा.
४५१) खड्‌गखान्तान्तस्थ---गणेशबीज ‘गं’ आहे. खडग शब्दात ते शेवती आहे. या अर्थी खडगान्ती असणारा. सर्व विनाशाअंतीसुद्धा अस्तित्वभाव. बीजामध्ये राहणारा.
४५२) खनिर्मल---आकाशाप्रमाणे निर्मल निर्लेप.
४५३) खल्वाटशृंगनिलय---वृक्ष हे पर्वताचे केस. वृक्षविहीन. ओसाड पर्वतारवती राहणारा. (खल्वाट = टक्कल)
४५४) खट्‌वाङ्गी---खटवाङ्गनामक अस्त्र बाळगणारा. (बाजेच्या खुरासारखे आयुध बाळगणारा.
४५५) खदुरासद---आकाशाप्रमाणे हाताच्या पकडीत न येणारा. अमूर्त.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५