Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक १३६ ते १४०

चतुर्विध-उपायमय: चतुर्वर्णाश्रमाश्रय: ।
चतुर्विध-वचोवृत्ति-परिवृत्ति-प्रवर्तक: ॥१३६॥
८५०) चतुर्विधोपायमय---साम-दाम-भेद-दण्ड या चार उपायांची मिळणार्‍या फलाचा साधक.
८५१) चतुर्वर्णाश्रमाश्रय---ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र हे चारही वर्ण आणि ब्रह्मचर्य-गार्हस्थ्य-वानप्रस्थ्य आणि संन्यास या चारही आश्रमांचा आश्रय असलेला म्हणजे यापैकी कोणीही याची उपासना करावी. शूद्रांना वेदाध्ययनाची बंदी होती. तशी गणेशोपासनेची बंदी कोणालाही नाही.
८५२) चतुर्विधवचोवृत्तिपरिवृत्तिप्रवर्तक---पश्यन्ती-मध्यमा-परा-वैखरी यांचा उद्‌भव आणि एकीतून दुसरीत होणार्‍या परिवर्तनाचा प्रवर्तक.
चतुर्थीपूजनप्रीत: चतुर्थीतिथिसम्भव: ।
पञ्चाक्षरात्मा पञ्चात्मा पञ्चास्य: पञ्चकृत्यकृत्‌ ॥१३७॥
८५३) चतुर्थीपूजनप्रीत---चतुर्थीस पूजन केले असता संतुष्ट होणारा.
८५४) चतुर्थीतिथिसम्भव---चतुर्थी तिथीस प्रकट झालेला.
८५५) पञ्चाक्षरात्मा---नाद-बिन्दू-मकार-अकार व उकार ही प्रणावान्तस्थित पाच अक्षरे आहेत तत्‌स्वरूप.
८५६) पञ्चात्मा---ब्रह्या-विष्णू-महेश-ईश्वर व सदाशिव या पाच विग्रहाने युक्त.
८५७) पञ्चास्य---आस्य म्हणजे मुख. विस्तृत मुख असणारा. पाच मुखे असणारा. ब्रह्माण्डाचा कवळ (घास) घेण्यास समर्थ.
८५८) पञ्चकृत्यकृत्‌---निर्मिती-पालन-संहार-तिरोधान (पूर्ण लय) आणि अनुग्रह (कृपा) या पाच क्रिया करणारा.
पञ्चाधार: पञ्चवर्ण; पञ्चाक्षरपरायण: ।
पञ्चताल: पञ्चकर: पञ्चप्रणवभावित: ॥१३८॥
८५९) पञ्चाधार---पञ्च महाभूतांचा (पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश) आधार.
८६०) पञ्चवर्ण---कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी वर्ण असूनही सत्य-त्रेता-द्वापर व कली या चार युगात अनुक्रमे हेम-धवल-रक्त व धूम्रवर्णांचे विग्रह धारण करणारा. (हेमवर्ण: कृतयुगे त्रेतायां धवलच्छवि: । द्वापरे रक्तवर्ण: त्वं कलौ तु धूम्रवर्णक:॥)
८६१) पञ्चाक्षरपरायण---‘नम: शिवाय’ असा शिवपञ्चाक्षर मन्त्र जपणारा.
८६२) पञ्चताल--- आंगठा व मधले बोट यातील अंतराला ताल म्हणतात.
८६३) पञ्चकर---२४ अंगुळे = १ कर (१२ अंगुळे = १ वीत) १२० अंगुळांएवढी उंची असणारा. किंवा चतुर्भुजरून आणि शुंडारूप पाचवा कर असणारा. किंवा प्र-पंचाचा निर्माता किंवा वरील पंचरूपात नटणारा.
८६४)  पञ्चप्रणवभावित---तार-वाग्भट-लज्जा-आभा व परा अशा पाच प्रणवांनी वाच्य असणारा.
पञ्चब्रह्ममयस्फूर्ति: पञ्चावरणवारित: ।
पञ्चभक्ष्यप्रिय: पञ्चबाण: पञ्चशिवात्मक: ॥१३९॥
८६५) पञ्चब्रह्ममयस्फूर्ति---सद्योजात-वामदेव-अघोर-तत्पुरुष व ईशान या पाच सगुण ब्रह्मस्वरूपी स्फूर्तीने युक्त.
८६६) पञ्चावरणवारित---अन्नमय-प्राणमय-मनोमय-विज्ञानमय-आनंदमय या पाच कोशांचे आवरण असलेला.
८६७) पञ्चभक्ष्यप्रिय---पंचखाद्य म्हणजे खसखस-खोबरं-खारिक-खडीसाखर आणि खवा या पाच पदार्थांचे मिश्रण ज्याला प्रिय आहे असा. किंवा लाडू-मोदक-पुरी-फेणी व वडे हे पाच पदार्थ ज्याला प्रिय आहेत असा.
८६८) पञ्चबाण---मदनस्वरूप. श्वेतकमल-अशोकपुष्प-आम्रमञ्जरी-नवमल्लिका आणि नीलकमल. हे कामदेवाचे पञ्चबाण आहेत.
८६९) पञ्चशिवात्मक---पंचशिव-बीजस्वरूप. कामेश्वरी उमा आणि कामेश्वर शिव यांची ऐश्वर्यरूप पाच बीजे, श्रीं ह्नीं क्लीं ग्लौं गं ही ती पाच बीजे.
षट्कोणपीठ: षट्चक्रधामा षड्‌ग्रन्थिभेदक: ।
षडध्व-ध्वान्त-विध्वंसी षड्‌-अड्गुल-महाह्नद: ॥१४०॥
८७०) षटकोणपीठ---षट्कोण चक्राने युक्त असे ज्याचे पूजापीठ (आसन) आहे.
८७१) षटचक्रधामा---मूलाधार-स्वाधिष्ठान्‌-मणिपूरक-अनाहत-विशुद्धी आणि आज्ञा या सहा चक्रांमध्ये ज्याचा वास आहे.
८७२) षडग्रन्थिभेदक---मूलाधार - मणिपूर आणि आज्ञा चक्रातील प्रत्येकी दोन अशा सहा ग्रंथींना मोकळे करून मुक्तिमार्ग प्रशस्त करणारा.
८७३) षडध्वध्वान्तविध्वंसी---पद-भुवन-वर्ण-तत्त्व-कला आणि मन्त्र यांना षडध्व म्हणतात. यांचे शोधन करून अज्ञानरूपी अडथळ्यांचा दोष दूर करणारा.
८७४) षड्ड्गुलमहाह्नद---ज्याचे नाभिकमळ सहा अंगुळे खोल असते तो. विशाल उदरामुळे खोल नाभी असणारा.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५