Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

नामस्मरण - सप्टेंबर १६

खरोखर , प्राब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत . प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो , मनाशी नाही . देहास सुखदुःख प्रारब्धाने मिळते . दुःख कोणालाही नको आहे , पण ते येते . सुखाचेही तसेच आहे . प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ . हे चांगले वा वाईट असू शकते . सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही , पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो , " मी देवाचे एवढे केले , मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे , मग मला असे दुःख का भोगावे लागते ? " पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे . त्याला देव किंवा संत काय करील ? समजा , आपल्याला काही पैशाची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे ; पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करु शकत नाही . फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल . त्याचप्रमाणे , आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार ? संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच . म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बर्‍यावाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे . खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते . म्हणून तो भोग टाळीत नाही .

मनुष्याच्या देहाच्या अवयवांत जसा कमीजास्तपणा असतो , त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे , म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे , कमीजास्त प्रमाणात येतात . आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते , पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो . जगातल्या घडामोडी जशा चालतात , तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात . आपल्याला येणार्‍या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात ; त्या भगवंताच्या नसतात ; त्या पाहुण्यासारख्या असतात . त्या जशा येतात तशा जातात देखील . आपण होऊन त्या आणू नयेत , आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरु नये . प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे , मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही . जो संताची किंवा सदगुरुची आज्ञा पाळतो , त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धरुपाने राहात नाही . भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी , म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळविल्यासारखेच आहे .

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १
नामस्मरण - सप्टेंबर २
नामस्मरण - सप्टेंबर ३
नामस्मरण - सप्टेंबर ४
नामस्मरण - सप्टेंबर ५
नामस्मरण - सप्टेंबर ६
नामस्मरण - सप्टेंबर ७
नामस्मरण - सप्टेंबर ८
नामस्मरण - सप्टेंबर ९
नामस्मरण - सप्टेंबर १०
नामस्मरण - सप्टेंबर ११
नामस्मरण - सप्टेंबर १२
नामस्मरण - सप्टेंबर १३
नामस्मरण - सप्टेंबर १४
नामस्मरण - सप्टेंबर १५
नामस्मरण - सप्टेंबर १६
नामस्मरण - सप्टेंबर १७
नामस्मरण - सप्टेंबर १८
नामस्मरण - सप्टेंबर १९
नामस्मरण - सप्टेंबर २०
नामस्मरण - सप्टेंबर २१
नामस्मरण - सप्टेंबर २२
नामस्मरण - सप्टेंबर २३
नामस्मरण - सप्टेंबर २४
नामस्मरण - सप्टेंबर २५
नामस्मरण - सप्टेंबर २६
नामस्मरण - सप्टेंबर २७
नामस्मरण - सप्टेंबर २८
नामस्मरण - सप्टेंबर २९
नामस्मरण - सप्टेंबर ३०