Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

नामस्मरण - सप्टेंबर ७

काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते . व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे . पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली , तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार ? पैसा टाकून देऊ नका , पण पैशाच्या प्रेमातही राहू नका . जिवापाड श्रम करुन जो कमवायचा , तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग ? पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे , किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे . व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे . आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरुर आहे . पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे , पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये . पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला , आणि यदाकदाचित तो गेला , तर भगवंताच्या इच्छेने गेला , असे म्हणून , आपले समाधान बिघडू देऊ नये . पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही ; आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते . अशी म्हण आहे की , ‘ पैसा पुरुन उरावा इतका मिळावा . ’ पण आपल्याला जगात काय आढळते ? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो . हे काही ‘ पुरुन उरणे ’ नव्हे . याच्या उलट , आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे . मनुष्य नेहमी म्हणतो की , ‘ माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे ; मी काय , आज आहे आणि उद्या नाही . ’ पण आपण जसे खात्रीचे नाही , तशी आपली मुलेबाळे तरी कुठे खात्रीची आहेत ? ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही .

पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले , असे योगवासिष्ठात वर्णन आहे , तसे ते आपल्यालाही लागू आहे ; फरक एवढाच की , रामाचे उदासपण पैसा ‘ असणेपणाचे ’ होते , आणि आपले उदासपण पैसा ‘ नसणेपणाचे ’ आहे . पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे , कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन वाटते . पण त्याबरोबरच भगवंत हवा असेही आपल्याला वाटते . आता , आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करु . आपल्यला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे . जास्तीची हाव करु नये . हा झाला आपला पैसा ; अर्थात , राहिलेला सगळा दुसर्‍याचा . त्याचा लोभ करु नये . श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी , म्हणजे लक्ष्मीसाठी , सर्व जीवन खर्च करतो . पण ती त्याचा मुळासकट नाश करते . म्हणून , नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळविली , की ती आपला नाश न करता , आपल्या आनंदाला कारण होते .

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १
नामस्मरण - सप्टेंबर २
नामस्मरण - सप्टेंबर ३
नामस्मरण - सप्टेंबर ४
नामस्मरण - सप्टेंबर ५
नामस्मरण - सप्टेंबर ६
नामस्मरण - सप्टेंबर ७
नामस्मरण - सप्टेंबर ८
नामस्मरण - सप्टेंबर ९
नामस्मरण - सप्टेंबर १०
नामस्मरण - सप्टेंबर ११
नामस्मरण - सप्टेंबर १२
नामस्मरण - सप्टेंबर १३
नामस्मरण - सप्टेंबर १४
नामस्मरण - सप्टेंबर १५
नामस्मरण - सप्टेंबर १६
नामस्मरण - सप्टेंबर १७
नामस्मरण - सप्टेंबर १८
नामस्मरण - सप्टेंबर १९
नामस्मरण - सप्टेंबर २०
नामस्मरण - सप्टेंबर २१
नामस्मरण - सप्टेंबर २२
नामस्मरण - सप्टेंबर २३
नामस्मरण - सप्टेंबर २४
नामस्मरण - सप्टेंबर २५
नामस्मरण - सप्टेंबर २६
नामस्मरण - सप्टेंबर २७
नामस्मरण - सप्टेंबर २८
नामस्मरण - सप्टेंबर २९
नामस्मरण - सप्टेंबर ३०