Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

नामस्मरण - सप्टेंबर १३

भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो , परिस्थिती आड येत नाही . ती व्यसनाच्या आड कुठे येते ? अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे , जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे . तोच कर्ता , आपण काहीच करीत नाही , अशी भावना ठेवावी ; म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा . आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा . त्याच्याशी बोलावे ; त्याचे नाम घ्यावे . नामासारखे दुसरे खरे साधन नाही . वासरु घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते , त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो . ज्याला एकदा नामाची गोडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते . विषय त्याला कडू वाटू लागतात . परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणे चुकीचे आहे . नाम घ्यायचे म्हणून कर्ममार्ग सोडू नये . नामाची गोडी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात . नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे ; आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही . नामात प्रेम येईल असे करावे . जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे . भगवंत आपल्या नामस्मरणात आहे . शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे ; आणि भाव शुद्ध होण्यासाठी सत्समागमावाचून दुसरा उपाय नाही . एकदा त्याचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढतो . ‘ मी ’ अमुक एक साधन करीन , असे म्हणू नये . ‘ परमेश्वरा , तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस , ’ अशी दृढ भावना ठेवावी . समजा , आपण एक व्यापार केला , त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले , तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही ; त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या , पैसा , प्रकृती दिली , त्याला आपण कधीही विसरु नये . भगवंत हा सहजसाध्य आहे , सुलभसाध्य नाही . निसर्गाने जे आपल्याकडे येते ते ‘ सहज ’ होय . म्हणून , सहजसाध्य याचा अर्थ , फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा .

भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यास समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा . जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे . जो बाह्य दृष्टीने पाहतो त्याला भगवंत दूर आहे ; जो अंतरंग पाहतो त्याला तो जवळ आहे . आपण मनुष्यजन्माला आलो ही आपण भगवंताचे होण्याची खूण आहे . भोग आणि दुःख यांत वेळ न घालविता , भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे . याच जन्मात सुविचाराने आणि सदबुद्धीने भगवंत आपलासा करणे , हेच आपले खरे कर्तव्य आहे . याकरिताच सतत त्याचे ध्यान करावे , आणि मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे , यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही .

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १
नामस्मरण - सप्टेंबर २
नामस्मरण - सप्टेंबर ३
नामस्मरण - सप्टेंबर ४
नामस्मरण - सप्टेंबर ५
नामस्मरण - सप्टेंबर ६
नामस्मरण - सप्टेंबर ७
नामस्मरण - सप्टेंबर ८
नामस्मरण - सप्टेंबर ९
नामस्मरण - सप्टेंबर १०
नामस्मरण - सप्टेंबर ११
नामस्मरण - सप्टेंबर १२
नामस्मरण - सप्टेंबर १३
नामस्मरण - सप्टेंबर १४
नामस्मरण - सप्टेंबर १५
नामस्मरण - सप्टेंबर १६
नामस्मरण - सप्टेंबर १७
नामस्मरण - सप्टेंबर १८
नामस्मरण - सप्टेंबर १९
नामस्मरण - सप्टेंबर २०
नामस्मरण - सप्टेंबर २१
नामस्मरण - सप्टेंबर २२
नामस्मरण - सप्टेंबर २३
नामस्मरण - सप्टेंबर २४
नामस्मरण - सप्टेंबर २५
नामस्मरण - सप्टेंबर २६
नामस्मरण - सप्टेंबर २७
नामस्मरण - सप्टेंबर २८
नामस्मरण - सप्टेंबर २९
नामस्मरण - सप्टेंबर ३०