Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

नामस्मरण - सप्टेंबर ५

एकदा एक बाई सोवळे नेसून स्वयंपाक करीत होती . बाईचे मूल झोपून उठल्यावर , अंथरुणातच ‘ आई , मला घे , ’ म्हणून रडू लागले . आई म्हणाली , ‘ बाळा , मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे , पण तू कपडे तेवढे काढून ये . ’ परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना , आणि ‘ आई , आई ’ म्हणून रडू लागला . तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले , आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले . आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे . वासना , विकार , अहंभाव , इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो , मग त्याची नि आपली भेट कशी होणार ? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे , त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे ; परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकीत नाही , तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही .

संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात . त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल . आपण पुराणात वाचलेच असेल की , श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना , श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की , ‘ ज्याला मी हवा असेन त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत , ’ हे ऐकून , दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले . अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे , कारण तो हे जाणून होती की , एका परमेश्वरावाचून बाकी सर्व व्यर्थ आहे . प्राणावाचून हजारो शरीरांचा काय उपयोग ?

कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे , तो शेषशायी आहे . तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे . परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करुन ठेवले आहेत . त्यांनी नामरुपी जादूचा दिवाद आपल्या हाती दिला आहे ; त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले . हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते . मी त्रिवार सत्य सांगतो की , नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही . नीती हा सर्वांचा पाया आहे . त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही . तीन गोष्टींनी अत्यंत जपा : परस्त्री मातेसमान माना , परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना , आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका ; तुम्हांला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल .

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १
नामस्मरण - सप्टेंबर २
नामस्मरण - सप्टेंबर ३
नामस्मरण - सप्टेंबर ४
नामस्मरण - सप्टेंबर ५
नामस्मरण - सप्टेंबर ६
नामस्मरण - सप्टेंबर ७
नामस्मरण - सप्टेंबर ८
नामस्मरण - सप्टेंबर ९
नामस्मरण - सप्टेंबर १०
नामस्मरण - सप्टेंबर ११
नामस्मरण - सप्टेंबर १२
नामस्मरण - सप्टेंबर १३
नामस्मरण - सप्टेंबर १४
नामस्मरण - सप्टेंबर १५
नामस्मरण - सप्टेंबर १६
नामस्मरण - सप्टेंबर १७
नामस्मरण - सप्टेंबर १८
नामस्मरण - सप्टेंबर १९
नामस्मरण - सप्टेंबर २०
नामस्मरण - सप्टेंबर २१
नामस्मरण - सप्टेंबर २२
नामस्मरण - सप्टेंबर २३
नामस्मरण - सप्टेंबर २४
नामस्मरण - सप्टेंबर २५
नामस्मरण - सप्टेंबर २६
नामस्मरण - सप्टेंबर २७
नामस्मरण - सप्टेंबर २८
नामस्मरण - सप्टेंबर २९
नामस्मरण - सप्टेंबर ३०