Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५

२६१९

पतनाच्या भया नोळखे पामर । करी वेरझार नानापरी ॥१॥

नायके कीर्तन न पाहे पंढरी । वैष्णवाचे दारीं न जाये मूढ ॥२॥

नानापरीचे अर्थ दाखवी वोंगळ । सदां अमंगळ बोले जना ॥३॥

हिंडे दारोदारीं म्हणे पुराणिक । पोटासाठी देख सोंग करी ॥४॥

वाचळ आगाळा बोलों नेदी लोकां । एका जनार्दनीं देखा फजीत होय ॥५॥

२६२०

भांडाचें तोंड भांड पुराण । वरी शिमग्याचा सण ॥१॥

काय उणें मग भांडा । बोलती वाउगें तें तोंडा ॥२॥

वेद शास्त्र नीति नाहीं । सैरावैरा बोलणें पाहीं ॥३॥

एका जनार्दनीं पाषांड । म्हणोनि फोडो त्याचें तोंड ॥४॥

२६२१

सांगें ब्रह्माज्ञान गोष्टी । माते पाहतां होती कष्टी ॥१॥

काय ज्ञान ते जाळावें । वदन तयाचें तें न पाहावें ॥२॥

करी कथा सांगें पुराण । वायां मिरवी थोरपण ॥३॥

जन्मला जिचें कुशीं । तिसीं म्हणे अवदसा ऐसी ॥४॥

ऐसें नसो तें संतान । एका विनवी जनार्दन ॥५॥

२६२२

आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥

सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥

बैसोनी बाजारीं सांगे ज्ञान गोष्टी । मातेसी करंटी म्हणे नष्ट ॥३॥

एका जनार्दनीं ते जन अधम । चौर्‍याशीं लक्ष जन्म भोगिताती ॥४॥

२६२३

सांगे बहु सोपया गोष्टी । करूं नेणो तो हातवटी ॥१॥

ऐसें याचें नको ज्ञान । ज्ञान नोहें तें पतन ॥२॥

सांगे लोका उपदेश । आपण नेणें तो सायास ॥३॥

शरण एका जनार्दनीं । त्याची अमंगळ वाणी ॥४॥

२६२४

सांडोनी आचार करती अनाचार । ब्रह्माचा विचार न कळे ज्यांसी ॥१॥

वाहाती भार वेदाचा आधार । शास्त्रांचा संभार सांगताती ॥२॥

पुराण व्युप्तत्ती वाउग्या त्या कथा । सांगती सर्वथा हितपर ॥३॥

एका जनार्दनीं अनुभवावांचुनीं । कोरडी ती कहाणी ब्रह्माज्ञान ॥४॥

२६२५

येवढा मंत्र सोपा सांडोनी सायासीं । कां रें प्रपंचासी गुंतुनीं पडसी ॥१॥

वाचे ब्रह्मज्ञान गोष्टी ते फोल । अंतरींचे बोल सर्व वायां ॥२॥

वृंदावनाचे परी वर वर रेखा । तैसें पढतमूर्खा वेद गोष्टी ॥३॥

एका जनार्दनीं प्रपंच टाकुनीं । परमार्थ साधनीं रिघें वहिला ॥४॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा

Shivam
Chapters
कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३
वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८
ब्राह्मण - अभंग २६०९ ते २६१३
विद्यावंत - अभंग २६१४
वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८
पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५
संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५
जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१
योगी - अभंग २६४२
तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४
महंत - २६४६ ते २६४६
मुक्त - अभंग २६४७
वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४
गोसावी - अभंग २६५५ ते २६६०
गुरु - अभंग २६६१ ते २६६५
मानभाव - अभंग २६६६ ते २६६७
फकीर - अभंग २६६८
अर्थी - अभंग २६६९
आशाबद्ध - अभंग २६७०
संत - अभंग २६७१ ते २६७२
फडकरी - अभंग २६७३
भजनी - अभंग २६७४ ते २६७५
पुजारी - अभंग २६७६
कथेकरी - अभंग २६७७ ते २७००
कथेकरी - अभंग २७०१ ते २७२०
कथेकरी - अभंग २७२१ ते २७४०
कथेकरी - अभंग २७४१ ते २७६०
कथेकरी - अभंग २७६१ ते २७८०
कथेकरी - अभंग २७८१ ते २८०८
समाधि योग - अभंग २८०९ ते २८२०
समाधि योग - अभंग २८२१ ते २८४०
समाधि योग - अभंग २८४१ ते २८६०
समाधि योग - अभंग २८६१ ते २८८६
देह - अभंग २८८७ ते २९१०
देह - अभंग २९११ ते २९३०
देह - अभंग २९३१ ते २९५०
देह - अभंग २९५१ ते २९७०
देह - अभंग २९७१ ते २९९०
देह - अभंग २९९१ ते ३०१२
स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५
स्त्री - अभंग ३०२६ ते ३०४१
धन - अभंग ३०४२ ते ३०५१
विषय - अभंग ३०५२ ते ३०७५
विषय - अभंग ३०७६ ते ३०८२
संसार - अभंग ३०८३ ते ३१००
संसार - अभंग ३१०१ ते ३१२०
संसार - अभंग ३१२१ ते ३१४०
संसार - अभंग ३१४१ ते ३१७७
मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२००
मुमुक्षूंस उपदेश - ३२०१ ते ३२२०
मुमुक्षूंस उपदेश - ३२२१ ते ३२४०
मुमुक्षूंस उपदेश - ३२४१ ते ३२६०
मुमुक्षूंस उपदेश - ३२६१ ते ३२८०
मुमुक्षूंस उपदेश - ३२८१ ते ३२९२
उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४
मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३१०
मनास उपदेश - अभंग ३३११ ते ३३३०
मनास उपदेश - अभंग ३३३१ ते ३३४३