Get it on Google Play
Download on the App Store

गाढव आणि लांडगा

एक चांगले धष्टपुष्ट गाढव पाहून त्याच्या मांसाचा एक तरी तुकडा आपल्याला खायला मिळावा असे लांडग्याला वाटले. मग ते गाढव आपल्या हाती लागावे म्हणून लांडग्याने वैद्याचे सोंग घेतले व सर्व प्राण्यांना कळविले की, 'मी देशोदेशी फिरून सर्व प्रकारच्या औषधांचे व वनस्पतीचे अनुभव घेतले आहेत. माझ्या हातून प्राण्यांचा कोणताही रोग बरा झाल्याशिवाय राहणार नाही.' त्याचा हा लबाडपणा ओळखून त्याची खोड मोडावी अशा विचाराने ते गाढव अगदी भोळेपणा दाखवून लंगडत लंगडत लांडग्याजवळ गेले व म्हणाले, 'वैद्यबुवा माझ्या पायात काटा रुतल्यामुळे मी फार हैराण झालो आहे, कृपा करून काही उपाय करा.' लांडगा म्हणाला, 'अरे, असा जवळ ये, मला तुझा पाय पाहू दे.' मग लांडग्याजवळ जाऊन गाढवाने मागल्या पायाची एक लाथ अशी जोरात झाडली की त्यामुळे लांडग्याचे तोंड फुटून तो सारखा ओरडत राहिला व गाढव पळून गेले व जाते वेळी मनात म्हणाले, 'मला फसवणार होता त्यालाच मी फसविलं !'

तात्पर्य

- शेरास सव्वाशेर मिळाल्याशिवाय रहात नाही.

इसापनीती कथा २०१ ते २५०

इसाप
Chapters
पारधी व साळुंकी मूर्ती वाहणारा गाढव मोठे झाड व लहान झाड नदीतला मासा व समुद्रातला मासा विहीरीत पडलेला कोल्हा एक डोळा असलेले हरिण गाढव, कोल्हा आणि सिंह दोन वाटसरू कबुतरे, घार आणि ससाणा कबुतर व मुंगळा घोडा व गाढव धान्य दळणारा माणूस बोकड आणि कुत्रा बेडूक आणि उंदीर बढाईखोर माणूस गाढव आणि त्याची सावली गरुड आणि मांजर गुराखी आणि मेंढी करडू व लांडगा बोकड आणि खाटीक कोल्हा व सिंह गव्हाणीतील कुत्रा हत्ती व प्राण्यांची सभा लांडगा आणि धनगर मधमाशी व साधी माशी मांजर व उंदीर मुंगी व कोशातला किडा स्वप्न पडलेले प्रवासी गाढव आणि लांडगा अतृप्त गाढव गाढव व कुत्रा गरुड पक्षी व कावळा कुत्रा आणि हंसी बकरीने पाळलेले मेंढरू बेडूक व दोन बैल चिलट व मधमाशी दोन कुत्र्या दोरीवरचा नाच गाढव व माळी कोंबडा व घोडा कुत्रा व त्याचे प्रतिबिंब असंतुष्ट मोर मुलगा व बोरे पारधी व त्याचा शिकारी कुत्रा गोठ्यातील सांबर शेतकरी व त्याचा नोकर शेतकरी व त्याचा कुत्रा शेतकरी व साप सिंह व दुसरे पशु बैल व बेडूक