Get it on Google Play
Download on the App Store

एक डोळा असलेले हरिण

एका हरिणाचा एक डोळा फुटला म्हणून ते नेहमी समुद्राकाठी चरत असे. समुद्राच्या बाजूने आपणास भिती नाही तेव्हा फुटका डोळा समुद्राकडे व धडका जमिनीकडे केला म्हणजे जमिनीवरून येणार्‍या शत्रूपासून आपला बचाव करता येईल असे त्याला वाटे. त्या हरणाची शिकार करण्यास एक शिकारी फार दिवस टपला होता. पण जमिनीच्या बाजूने त्याचा काही उपाय चालेना. मग तो होडीत बसून समुद्रातून हरणाजवळ आला व त्यावर गोळी झाडून त्याने त्याचा प्राण घेतला. प्राण जातेवेळी हरिण मनाशीच म्हणाले, 'अरे, काय हे दुर्दैव ! तुझी करणी विचित्र व अगम्य आहे. जिकडून मला धोका पोहचण्याची शक्यता होती तिकडून तो न पोचता मला सुरक्षित वाटणार्‍या बाजूनेच तो पोचला. खरच हा दैवयोग विचित्र आहे.'

तात्पर्य

- आपण ज्याला मोठे विश्वासू समजतो, तेच प्रसंगी आपला नाश करण्यास प्रवृत्त होतात व जे आपणाला अविश्वासू वाटतात तेच प्रसंगी आपल्या उपयोगी पडतात, असे कधी कधी घडते.

इसापनीती कथा २०१ ते २५०

इसाप
Chapters
पारधी व साळुंकी मूर्ती वाहणारा गाढव मोठे झाड व लहान झाड नदीतला मासा व समुद्रातला मासा विहीरीत पडलेला कोल्हा एक डोळा असलेले हरिण गाढव, कोल्हा आणि सिंह दोन वाटसरू कबुतरे, घार आणि ससाणा कबुतर व मुंगळा घोडा व गाढव धान्य दळणारा माणूस बोकड आणि कुत्रा बेडूक आणि उंदीर बढाईखोर माणूस गाढव आणि त्याची सावली गरुड आणि मांजर गुराखी आणि मेंढी करडू व लांडगा बोकड आणि खाटीक कोल्हा व सिंह गव्हाणीतील कुत्रा हत्ती व प्राण्यांची सभा लांडगा आणि धनगर मधमाशी व साधी माशी मांजर व उंदीर मुंगी व कोशातला किडा स्वप्न पडलेले प्रवासी गाढव आणि लांडगा अतृप्त गाढव गाढव व कुत्रा गरुड पक्षी व कावळा कुत्रा आणि हंसी बकरीने पाळलेले मेंढरू बेडूक व दोन बैल चिलट व मधमाशी दोन कुत्र्या दोरीवरचा नाच गाढव व माळी कोंबडा व घोडा कुत्रा व त्याचे प्रतिबिंब असंतुष्ट मोर मुलगा व बोरे पारधी व त्याचा शिकारी कुत्रा गोठ्यातील सांबर शेतकरी व त्याचा नोकर शेतकरी व त्याचा कुत्रा शेतकरी व साप सिंह व दुसरे पशु बैल व बेडूक