आई आणि बायको...
हजार चुका माफ केल्या
आई घरात असतांना,
एकही चूक खपली नाही
घरात बायको असतांना....
शहाणं बाळ म्हणायची
बाळ शहाणं नसतांना,
सारखा वेंधळा वाटतो
बायको घरात असतांना...
दालबट्टी खूप रंगायची
शेतात रात्री बसतांना,
हल्ली उघडत नाही दार
बायको घरी असतांना...
खूप मज्जा यायची तेव्हा
पदराखाली लपतांना,
मोठ्या घरात कुठं लपावं
बायको घरात असतांना....
आई वेगळीच भासते
काही जवळ नसतांना,
थोडी जागा तिलाही मिळेल का?
बायको घरात असतांना...
संजय सावळे