पितरपाठ...
सकाळ पासून सुन
होती किती मग्न,
पितरं जेवून घरातली
जाणार होती म्हणे इग्न..
आयुष्यभर म्हाताऱ्यासंग
पुत्र वागला वैऱ्यागत
भरवणार होता घास
तोची त्याला देवागत
फोटो समोर भरलं
तुमच्या साठी ताट,
चंदनाच्या टिळयासोबत
अगरबत्तीचा थाट....
एव्हढं सगळं खावून
फोटोत तुम्ही मावणार नाही,
शुगर बीपी च्या त्रासाने
कुठं जाताही येणार नाही....
सकाळपासून सून मुलगा
राबराब राबताय,
नैवेद्यासाठी कावळ्याची
चातकागत वाट पाहताय....
फोटोमधून दिसत असेल
किती जीव होता तुमच्यात,
कावळा शिवायच्या आत
पुन्हा राहायला या यांच्यात....
असं सत्य घडून आलं तर
पितृपक्ष राहणार नाही,
सुनाचं काय पण मुलगाही
पितराला बोलावणार नाही...
संजय सावळे