आयुष्य आणि फुलं...
मी शोधण्यास काही,
दूर आज निघालो,
गर्दीत माणसाच्या
चेहरे हरवून गेलो....
रस्त्यावरून चेहरे
वाहून खूप गेले,
कोसळण्या अधिच ते
सागरास मिळून गेले....
किती फुले होती
परडीत वेचलेली,
कुठलेशा गंधाने
घेऊन आज आलो ...
ना जात होती ना कुठलं नातं
श्वास सुगंधाने भरीत गेलो,
आयुष्याचे गणित तेव्हढं
फुलांकडून शिकुन गेलो.....
संजय सावळे