पैंजण.....
कधी जाईल तोल माझा
उभा मी स्तंभावर,
गडद अंधारात आलो
हरवून माझं घर...
किती शोधिले तुला
चांदण्यात नभोवर,
ढगांआडून कधी
दूर क्षितिजापार...
डोळ्यातले काजळ
पसरले सैरभैर,
उमटली पावलांची
ठसे त्यांवर...
नाजूक पैंजनाचा
नकोस देऊ हुंकार,
कधी जाईल तोल माझा
उभा मी स्तंभावर....
संजय सावळे