वैष्णवांचा मेळा...
साक्षर झालेल्या समाजाला
जातीबद्दल बोलावं म्हणलं....
गावा बाहेरील वस्त्यांना
गावासोबत जोडावं म्हणलं....
कुबट विचारांची होळी रोज
चौकात पेटवावी म्हणलं....
अस्पृश्यासारखं लढून पुन्हा
चवदार तळं चाखावं म्हणलं....
जाता जाता रस्त्यावरची
मस्तकी धूळ लावावी म्हणलं....
स्वर्ग नरकासारखेच येथे
पाप-पुण्य शोधावं म्हणलं....
वैष्णवांच्या मेळ्यामधी
स्वतःला हरवून जावं म्हणलं....
पांडुरंग होऊन कुंडलिकाला
डोळे भरून पाहावं म्हणलं....
पापा सोबत चंद्रभागेत
जात अर्पण करावी म्हणलं....
संजय सावळे