बाभूळ...
माझ्या भोवती सारे
उजाडले पिवळे रान,
नभातून उतरेल कधी
इंद्रधनुची कमान...
पिवळ्या फुलांची सुंदर
उंच बाभूळ बांदावर,
जसा उभा जेजुरीचा
खंडेराय मल्हार...
सांजवेळी दाटले वर
नभावरी नभ,
कोसळुन भराभर सरी
मिटेल ही धग...
धगीमध्ये पोळून गेलं
आयुष्याचं सार,
मलाच मी शोधीत गेलो
जेव्हा दाटला अंधार...
संजय सावळे