Get it on Google Play
Download on the App Store

गळफास..

हल्ली सुना खुशाल घेतात गळफास
संपवतात आयुष्य हलक्या वेदनेचं,
खरंच गुन्हेगार असतात का येथे
सासुसासरे आणि दीरनणंद ह्यांचे...

पाहिलं होतं घरदार त्यावेळी
चौकशीही केली होती संस्काराची,
अचानक असं घडतं काय आणि
क्षणात होती धुळवड आयुष्याची...

खरे चढतात फासावर माघे उरलेले,
जिवंत असूनही यातना भोगणारे.
सर्वच गुन्हेगार असायला पाहिजे 
पाहुनकीला हे जेवणारे...

हुंड्यासाठी आरोप होतात खुप
किंवा छळलंही असेल अतोनात,
म्हणून काय घ्यावा गळफास अन
तोडावी दोरी आपल्याच अंगणात..

हे कुठं तरी थांबायला हवं
कोण कुठं चुकतो पाहायला हवं,
आणखी किती जाणार बळी
एकदा फासालाचं विचारायला हवं..

संजय सावळे