वनवास
मन हे आज असे कसे अस्थिर झाले,
का कोण जाने कोण यास आठवले,
घरची आठवन येते याला की जुने दिवस मनी आले,
नयनही चिंब पावसात न्हाले,
का कुणास ठाऊक यांना कुणी रडविले,
आईच्या मायेची भुक भागवन्या करता यांनी थैमान घातले,
डोक्यातून ही विज कशी सळसळली,
जिने नखशिखांत कांती शहारली,
मनाची गोष्ट मनवून घेण्या करता,
इने इथपर्यंत मजल मारली,
नको नको हे सारे विसरून जातो,
जे मिळू शकत नाही त्या करता उगा कशाला त्रागा करतो,
भविष्य सुख कमावण्याकरता, वर्तमानातील आनंद गमावतो आहे,
म्हणूनच रामा सारखा वनवास मज मनी भासतो आहे.
शैलेश आवारी
2007