आयुष्याच तळ
आयुष्याच तळ, मित्र अन मैत्रिणीच्या आठवनींच्या थेंबानी भरले तर,
शांत हे मन होत, दुःखातही ते खुदकन हसत,
द्रुढ ते निर्णय होतात, संकटात जे धीर देतात,
मनमोकळे ते विचार होतात, जगण्यातला जे आनंद देतात,
बर्याचदा असे ते क्षण येतात, आठवनी जे मागे सोडून जातात,
मग आयुष्यही सुंदर होत, जगण्यातला जे अर्थ देऊन जात.
शैलेश आवारी
24/10/2009